अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर तळेगाव पोलिसांची कारवाई

 


रेती वाहतूक करणारा ट्रॅक पोलिसांच्या ताब्यात


जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण निकेतन कदम यांनी सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील वरली, जुगार, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी, अवैध रेती वाहतूक व गोवंश वाहतूक यांचे विरुद्ध कठोर कारवाई करणे बाबत सर्व ठाणेदार यांना आदेशित केले आहे.

त्यानुसार दिनांक 24मे रविवार रोजी रात्रीच्या सुमारास तळेगाव दशसर येथील पोलिस अधिकारी व अंमलदरी यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करणे करिता गस्त करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तळेगाव येथील बसस्टॉप येथे टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 28 बी बी 6066 मिळून आल्याने पंचसमक्ष त्याची पाहणी केली असता त्यामध्ये बिना रॉयल्टी 10 ब्रास काळी रेती मिळून आली. त्यामुळे 50 लाख रुपयांचा ट्रक व एक लाख वीस हजार रुपयांची दहा ब्रास रेती असा एकूण 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल तळेगाव पोलिसांनी जप्त केला असून हेड कॉन्स्टेबल अमर काळे यांच्या फिर्यादीवरून चालक इमरान खान रेहमत खान वय 31 वर्ष रा. मलकापूर, शेंदुरजना घाट तालुका वरुड जिल्हा अमरावती व ट्रक मालक अजय शामरावजी ढवळे वय 27 वर्ष राहणार दस्तूर नगर अमरावती यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप क्रमांक 116/2026 कलम 302(2),3(5)भारतीय न्याय संहिता 2023, कलम 9,15 पर्यावरण संरक्षण अधिनियम1986, कलम 3,7 सार्वजनिक संपती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 व कलम 130(1), 177 मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे अनिल पवार, पोलीस निरीक्षक किरण वानखेडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार किरण औटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर काळे, कॉन्स्टेबल यशवंत काळे, गौतम गवळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post