सिंदखेडच्या वसंतराव नाईक विद्यालयाची निकालात उज्वल परंपरा कायम; नमन शिंदे प्रथम
वसंतराव नाईक विद्यालय, सिंदखेड ता. माहूर जि. नांदेड या उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या निकालात यंदाही उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील विद्यार्थी नमन गजानन शिंदे याने 92.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल विमुक्त जन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे अध्यक्ष ॲड. सचिनजी राठोड, वसंतराव नाईक विद्यालय सिंदखेडचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

