भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष व महामंत्री यांनी घेतली नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची सदिच्छा भेट.

 



भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष व महामंत्री यांनी घेतली नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची सदिच्छा भेट.


जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर


अमरावती / तळेगाव दशासर आपल्या जिल्ह्याला नवनिर्वाचित तरुण जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले असून आता जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष त्यांच्या कार्यावर लागलेले आहे, मार्च 2023 मध्ये महाल दंगल प्रकरणी कदम साहेब यांची अविस्मरणीय कामगिरी त्या प्रकरणांमध्ये होती त्यामुळे त्यांची अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक येथे बदली झाल्यामुळे जिल्ह्यातील जनता ही त्यांच्याकडे लक्ष लावून आहे, त्याच निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे तसेच महामंत्री तुषार धनंजोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासमोर जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचला आज रोजी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या गोरख धंदे बंद झाले पाहिजे व जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे व तरुण पिढी या व्यसनाधीनते पासून दूर राहावी यासाठी उपाययोजना करण्याचे साकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना घातले. चर्चा करत असताना जिल्ह्यामध्ये 2017 साली असेच कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी पोलीस अधीक्षक म्हणून लाभले होते ते म्हणजे अविनाश कुमार  त्यानंतर मधातला काळ हा जिल्ह्यासाठी अतिशय वाईट होता, आज अमरावती जिल्ह्याला लाभलेले पोलीस अधीक्षक हे नक्कीच जिल्ह्याला पूर्ववत चांगले दिवस आणतील अशी त्यांनी ग्वाही दिली.

Post a Comment

Previous Post Next Post