लायन्स क्लब अमरावती रियलची ८ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 


         Gavakadachi batmi 

अमरावती :- लायन्स क्लब अमरावती रियलची २०२६–२७ या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी लायन डॉ.दीपक क-हे, सचिवपदी लायन श्याम जडीया तर कोषाध्यक्षपदी लायन गौरव कोटवानी यांची निवड करण्यात आली.

ही निवड जाहीर करण्यासाठी व क्लबच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी ८ वी सर्वसाधारण सभा अमरावती येथील हॉटेल आदर्श येथे आयोजित करण्यात आली होती. सभेची सुरुवात ध्वज वंदनाने झाली, त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

यानंतर सचिवांनी मागील महिन्यातील विविध सामाजिक सेवा उपक्रमांचा अहवाल सादर केला. सभेत सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये हरेश उदासी,चंद्रदत्त मिश्रा,लक्ष्मीकांत जोशी, दिनेश अग्रवाल,राजा किंगराणी व हेमंत वाळचळे यांचा समावेश होता.

या प्रसंगी हेमंत वाळचळे,राजा किंगराणी,प्रकाश आवतराम व दिनेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी क्लबच्या कार्याची प्रशंसा करत आगामी वर्षात अधिक जोमाने सेवा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.

नवीन अध्यक्ष डॉ. दीपक क-हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून,मी ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण जबाबदारीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.”

या प्रसंगी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.त्यामध्ये लायन दिनेश अग्रवाल, प्रकाश आवतराम,प्रकाश मनोजा,सुरेंद्र मावळे,संजीव पोटे, हरीश उदासी, चंद्रदत्त मिश्रा, लक्ष्मीकांत जोशी,विवेक भेटालू, सोहेल तापर आदींचा समावेश होता.

कार्यक्रमास विद्यमान अध्यक्ष मनोज मिश्रा,सचिव संजीव विंचूरकर, कोषाध्यक्ष हेमंत पच्चीगर,झोनल चेअरपर्सन हेमंत वाळचळे तसेच रीजन चेअरपर्सन राजा किंगरानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सभेचा समारोप उत्साही वातावरणात करण्यात आला. तसेच मीटिंगची सांगता स्वादिष्ट भोजनाने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post