राज बारब्दे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !

 



राज बारब्दे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !




उपसंपादक संतोष भालेराव गावाकडची बातमी 

ज्ञानेश्वर उर्फ राज बारब्दे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शोरूममध्ये उत्साहपूर्ण वातावरणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पंकज सोलरचे संचालक तसेच सरपंच सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष म्हणून सामाजिक, व्यावसायिक व संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राज बारब्दे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या शोरूममध्ये जाऊन शिवसेना उबाठा चे जेष्ठ पदाधिकारी अभिजीत काळमेघ सर तसेच सागर प्रजापती, गणेश शिवहरे तसेच संतोष भालेराव यांनी पुष्पगुच्छ देऊन राज बारब्दे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थितांनी राज बारब्दे यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि सौरऊर्जा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली असून युवकांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याचे मान्यवरांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त शोरूममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post