निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापन दिन ५ जूनला; माहूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा

 



सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांचा गौरव राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून संघटनेची स्थापना, राज्यभरातील पत्रकारांना निमंत्रण



गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा श्रीक्षेत्र माहूर येथे आयोजित करण्यात आला आहे.शहर व ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना समाजकंटकांकडून त्रास सहन करावा लागतो. तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पत्रकारांना एक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता यावे, या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून 'निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ' या संघटनेची स्थापना करण्यात आली.


या संघाचा वर्धापन दिन येत्या ५ जून रोजी आहे. या दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन ५ जून रोजी माहूर येथे करण्यात आले आहे. उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, अध्यात्म, कायदेविषयक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच निर्भयपणे व निःपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या शहरी व ग्रामीण पत्रकारांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. पत्रकार हा लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ आहे. तो तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडतो. मात्र, त्याला संरक्षण व सन्मान मिळत नाही. त्यामुळे आम्ही ही संघटना उभी केली. या सोहळ्याच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले.या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी,तसेच महाराष्ट्रातील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी माहूर येथे सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post