प्रतिनिधी /प्रमोद घाटे
दि.०९/05/2026 :- मोशिॅ तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेले नेरपिंगळाई अनेक समस्यांनी ग्रस्त तेथील तलाठी कार्यालय व महसुल विभाग सध्या झोपेच्या अवस्थेत आहे .तेथील कार्यालय माहिती अधिकार 2005 चे नियमावली नाही तसेच अपिली अधिकारी कोण आहे याचे नाम फलक नाही तसेच तेथील तलाठी .मनवरे यांना हालचाल रजिस्टर माहिती नाही म्हणजेच अधिकारी काय काम करत आहे हे आपल्या लक्षात आले असेल तसेच मोर्शी येथील नायब तहसीलदार वानखडे याना सदर प्रकरणाची कल्पना दिलेली आहे तरी पण काही बदल दिसून येत नाही आहे.तसेच उत्खनन हे मोठ्या प्रमाणात सुरु आहे तरी याला अभय देण्याचे काम येथिल मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय मिळुन सुरु आहेत अशि जनमानसात चर्चा सुरू आहे.
तलाठी कार्यालय नेरपिंगळाई येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अमोल तिरमारे यांनी काहि कामानिमित्त भेट दिली असता तलाठी कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला, लवकरात लवकर कार्यालयात कार्यालयीन व योजनेसंदर्भात फलक दर्शनिय भागात लावण्यात यावे व तात्काळ कामचुकार अधिकारी यांना नोटीस पाठवावि अशि मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अमोल तिरमारे यांनी तलाठी कार्यालयातुनच नायब तहसीलदार यांच्या सोबत फोन वरून चर्चा केली, तसेच संबंधित प्रकरणांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्या जाईल अशी प्रतिक्रिया युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अमोल तिरमारे यांनी आमच्या प्रतिनिधी कडे दिली.




