बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिनानिमित्तनिमित्त खीरदान

 



                छायाचित्र ईलीयास बावानी माहूर 

नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सभापतींनी घेतला खीर दानाचा आस्वाद



श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिनानिमित्त खीरदान कार्यक्रम संपन्न 



श्रीक्षेत्र माहूर  : 

बुद्ध पौर्णिमा तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त निमित्त माहूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले तर तहसील कार्यालयाचा गेटवर असलेल्या स्वर्गीय पिपळी बाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत राठोड यांनी उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे संचालक विजय भाऊ कांबळे यांचे कडून मान्यवरांच्या उपस्थितीत आलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर खीरदान करण्यात आले.



माहूर शहरात अन्नदान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले विजय भाऊ कांबळे यांच्या श्रीदत्त कृपा प्रतिष्ठान येथे झालेल्या खिरदान कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून खीर प्राशन केली यावेळी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी माजी जि.प सभापती संजय राठोड भाजपाचे डॉ निरंजन केशवे अनिल वाघमारे ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय आमले डॉ ओमप्रकाश साबळे, डॉ आकाश जाधव ,किसन राठोड, संदीप राठोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन राठोड पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी पत्रकार वसंतराव कपाटे सय्यद रहमत अली फिरोज पठाण एड धीरज शेंडे व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी नंदकुमार जोशी मुक्रम शेख कक्ष अधिकारी रणजीत लोखंडे ,वि अ पं किशोर वागदरे ,प्रविण काळेगोरे ,नरेंद्र जोशी वडजे नातंह ,निलेश राऊत ,राजू राठोड, मरवाळे महाराज मिरजकर संतोष पहुरकर दीपक कांबळे माजी सभापती उमेश जाधव दिगंबर जोशी कदिर बावाणी शेख सलीम प्रताप हजारे सोनकांबळे मुंगशीचे उपसरपंच श्रीकांत राठोड लक्ष्मीकांत उर्फ पिंटू पाटील शिवसेनेचे संघटक विनोद पाटील सूर्यवंशी संदीप राठोड बालाजी गेंटलवार नयनसिंह राठोड नवल वानखेडे दीपक ठाकूर बंडूभाऊ राठोड पालागुडाकर राम केंद्रे सिद्धार्थ भालेराव पवन चव्हाण विशाल खरे किशोर आत्राम दयाळू जाधव बंडू चव्हाण यांचे सह शेकडो नागरिकांनी खिरदान कार्यक्रमाचा आनंद घेतला.

शहरातील तहसील कार्यालय नगरपंचायत कार्यालय यासह तालुक्यातील सर्व ठिकाणी बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.








Post a Comment

Previous Post Next Post