आमदारांच्या अंदाज समिती ची दिशाभूल !
चिरोडी आश्रमशाळेत काळाबाजार ?
अमरावती : जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे दि. 28/04/2026 रोजी शासकिय आदिवासी आश्रम शाळा चिरोडी ता. चांदुर रेल्वे येथे समितीने प्रत्यक्ष तपासणी भेट दिली, या भेटी दरम्यान तेथील मुख्याध्यापक व अन्य तमाम कर्मचा-यांनी मागील वर्षभ-यातील असंख्य तक्रारी तेथील प्रशासकिय दिरंगाईच्या बाबी तसेच आश्रम शाळेमधील कित्येक शासकिय दप्तरामधील नोंदी समितीला दाखविल्याच नसून अगदी समितीचे स्वागत जणू आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक महोत्सव आहे आणि समितीमध्ये धुरंधर सिनेमातील रणविरसींग हमजा म्हणून आल्या सारखेच वातावरण समिती समोर यांनी केले.
मागील वर्षभरामध्ये आश्रम शाळेतील कर्मचा-यांनी चक्क फौजदारी कार्यवाया सुध्दा केलेल्या आढळून येतील यावरून ही शासकिय आश्रम शाळा प्रचंड वादग्रस्त म्हणून जिल्ह्यातील तमाम वृत्तपत्रामध्ये झळकत आहे.
आश्रम शाळेतील कर्मचा-यांच्या अजीत रजा आणि मंजूर रजा यामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून चक्क मुख्याध्यापकासह कित्येक कर्मचारी शासकिय आश्रम शाळेतून कार्यालयीन वेळेत वेळी अवेळी गायव असतात तेथील सीसी टिव्ही फुटेज जर आपण प्रत्यक्ष बघण्याकरीता बोलावून घेतले तर या सी सी टिव्ही मधून ती संपूर्ण सत्यता निश्चित बाहेर येईल.
याच वर्षभराच्या काळामध्ये तत्कालीन आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या शासकिय वाहनामध्ये कुठल्याच प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता किंवा दौरा दैनंदिनीमध्ये कुठलीच वर्षभराची नोंद न ठेवता वरील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री. जवाहर गाडगे हे सतत तत्कालीन आदिवासी अप्पर आयुक्त यांच्या समवेत त्यांच्या अधिनस्त असलेल्या तमाम अनुदानित, शासकिय आश्रम शाळा व वसतिगृहामध्ये असलेल्या प्रत्येक शासकिय कार्यक्रमामध्ये हजर दिसून आलेले आहेत.
तसेच त्यांच्या या असण्यामधून जितेंद्र चौधरी यांच्या ऐवजी आदिवासी अप्पर आयुक्त हे जवाहर गाडवेच आहे अशी जणू वर्षभरातील त्यांची प्रतिमाच त्यांनी तयार केली होती.
त्यांच्या अधिनस्त असलेल्या प्रत्येक शासकिय आश्रम शाळा व वसतिगृहामधील कर्मचारी यांना कुठलेही प्रशासकिय अथवा शासकिय काम असल्यास जवाहर गाडवेच हे तमाम अधिकारी कर्मचा-यांचे मार्गदर्शक होते.
आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळ.. ?
आदिवासी अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयामार्फच चालणा-या तमाम योजना, कर्मचा-यांच्या बदल्या, शासकिय बांधकामे, कर्मचा-यांची पदोन्नती व जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा अनेक बाबींचे आर्थिक व्यवहार व त्या व्यवहाराचा आर्थिक विनियोग हा संपूर्णतः जवाहर गाडवे यांनीच केला असून त्यांचा मागील वर्षाभराचा आर्थिक ताळेबंदच अत्यंत सुक्ष्म पध्दतीने तपासावा तसेच जवाहर गाडवे व तत्कालीन आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या चलअचल संपत्तीची व मागील वर्षातील यांच्या काही दैनंदिन व्यवहाराची सुध्दा चौकशी केल्यावर करोडो रुपयांचे घबाड निदर्शास येईल.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने अत्यंत सखोल चौकशी करून यामधील दोषी अधिकारी कर्मचा-यांवर तसेच अंदाज समिती विधान भवन, मुंबई यांची दिशाभूल करणा-यांवर कठोर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी प्रेम एन थॉमस यांनी केली आहे.
chirodi-ashramshala-investigation
tribal-students-exploitation_maharashtra_ashram-school-corruption-exposed
Tags - #TribalWelfare,#AshramSchool,#EducationScam,#CorruptionExposed,#Government_Fund-Scam,#Administrative_Negligence,#ChildSafety#Tribal Rights,#RuralIssues,#SocialJustice
