जुना धामणगाव येथील शासकीय वसतिगृह येथे मोफत प्रवेशासाठी अर्ज सुरू

 

Dhamangav railway


जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

Amaravati,धामणगाव रेल्वे:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे शैक्षणिक सत्र 2026 - 27 साठी मोफत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर पात्र प्रवर्गातील इयत्ता आठवी पासून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम आणि वायफाय सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार असून गुणवत्तेनुसार व रिक्त जागेनुसार प्रवेश दिला जाईल, शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत 30 जून 2026 असून 11वी 12वी ( कनिष्ठ अभ्यासक्रम) बिगर व्यावसायिक (महाविद्यालयीन) अभ्यासक्रमासाठी 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येईल.

https./hmasnew.mahait.org या संकेत स्थळावर वसतिगृह प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अंतिम करायची दिनांक 7/7/2026 (शालेय व इयत्ता11वी,12वी,) तसेच दिनांक 31/7/2026(बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) रीतसर ऑनलाईन अर्जाची एक प्रत व आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृहाला आणून द्यावे, अधिक माहितीसाठी वसतिगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आव्हान केले गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post