बहुजन समाज पार्टी कारंजा विधानसभा समीक्षा बैठक संपन्न

 


Gavakadachi batmi network 

वाशिम -  दि. 14 जून 2026 रविवार रोजी शासकीय विश्राम गृह कारंजा येथे कारंजा- मानोरा विधानसभा  पदाधिकारी यांची समीक्षा बैठक घेण्यात आली .सदरील समीक्षा बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा विदर्भ झोन प्रभारी इंजि. दादारावजी उईके यांनी व जिल्हा अध्यक्ष  ॲड. राहूल गवई  यांनी घेतली आणि मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना प्रदेश सचिव दादाराव उईके  यांनी सांगितले की, जर बसपा चा हत्ती येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये सभागृहामध्ये पाठवायचा असेल तर तुम्हाला गाव तेथे शाखा स्थापन करावी लागेल आणि सेक्टर व बुथवर लक्ष दिले तर नक्कीच बसपाचा हत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभागृहामध्ये पोहोचेल त्याकरिता तुम्ही आजपासूनच कामाला लागून गाव तिथे शाखा अभियान चालू करा असे आव्हान  बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव इंजिनियर उईके  यांनी केले तसेच ज्येष्ठ नेते व वाशिम जिल्हा प्रभारी मा. भाऊराव वासनिक,  यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणांमध्ये सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शासनकर्ते जमात बनले पाहिजेत त्यामुळे " जा आणि आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे"त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चित बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता वाटेल त्या परिस्थितीत काम करू तसेच  बसपा जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई यांनी सांगितले की बुद्ध फुले शाहू आंबेडकर व मान्यवर कांशीरामजी साहेब या आदर्श महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून येणाऱ्या काळामध्ये हजारो कार्यकर्ते तयार झाले तर निश्चितच बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार निर्माण होईल त्याकरिता गाव तिथे शाखा अभियान चालू करू असे आपले विचार मांडले,सोबत कार्यक्रमांमध्ये कारंजा विधानसभा अध्यक्ष मा. दीपक भाऊ वानखडे यांनी प्रास्ताविक भाषण केले व संपूर्ण विधानसभेचा  केलेल्या कामाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू दादा वाहने जिल्हासचिव  यांनी केले तर या कार्यक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष भारतभाऊ सावळे , कारंजा शहराध्यक्ष प्रशांत लेवे रवींद्र भाऊ बडगे, विधानसभा संघटक, पवन कुमार कदम विधानसभा महासचिव, विनोदकुमार सोनवणे कारंजा विधानसभा सचिव, राहुल इंगळे करंजा विधानसभा कोषाध्यक्ष, मिलिंद इंगळे, मनोहर मेश्राम, राजेंद्र रंगारी, उपस्थित होते तसेच यावेळेस या समीक्षा मीटिंगमध्ये बसपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे आभार प्रशांत लेवे यांनी  केले.

Post a Comment

Previous Post Next Post