पांढरकवडा क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावा; आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 





यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे 

पांढरकवडा, प्रतिनिधी : सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, पांढरकवडा येथे क्रीडा संकुलाच्या विकासकामांबाबत आढावा बैठक आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीत पांढरकवडा क्रीडा संकुलातील विविध मैदानांची सद्यस्थिती, स्वच्छता, देखभाल, खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच मैदानाच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मैदाने खेळाडूंना सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व सुविधा असलेल्या वातावरणात उपलब्ध व्हावीत, यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करून नियमित देखभाल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी क्रीडा संकुल परिसरातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करणे, खेळाडूंना सरावासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. युवकांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पांढरकवडा क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी विविध सकारात्मक निर्णय घेण्यात आले.बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post