माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील बालाजी शेखा मळावी यांचा मदनापुर घाट परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास बालाजी मळावी हे घरून ट्रॅक्टर घेऊन मदनापूर घाटातून रेती आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, घाट परिसरात ट्रॅक्टरचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.
ट्रॅक्टर घाटाच्या बाजूला जात असताना चालक बालाजी मळावी यांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमएच 29 एडी 8541 या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बालाजी मळावी यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
तसेच, या अपघाताची सखोल चौकशी करून मृताच्या कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गावाकडची बातमी प्रतिनिधी :
पंकज जयस्वाल, माहूर-किनवट, जिल्हा नांदेड
मो. 9421367593
