क्रीडा भवन वाचविण्यासाठी महापालिका कर्मचारी एकवटले,१००वर्षाचा इतिहास असलेल्या क्रीडा भवनाची ओळख पुसू नका!लढा देण्याचा निर्धार
मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.२६ एप्रिल १९२६ रोजी लावलेल्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला.तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी म्युनिसिपल जिमखाना स्थापन केला.त्याच वेळी जिमखाना अबाधित ठेवण्यासाठी घटना तयार केली त्याच घटनेवर आधारित क्रीडा भवनाचे प्रशासकीय कामकाज चालू आहे.दर दोन वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक घेऊन सभासदांमधुन अकरा उमेदवार निवडून येतील त्यांची कार्यकारिणी समिती क्रीडा भवनाचा प्रशासकीय कामकाज करेल.कर निर्धारण व कर संकलन खात्याकडून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते.क्रीडा भवनाचे विविध खेळांचे संघ आहेत.कबड्डी संघ ( पुरुष व महिला), कॅरम संघ (पुरुष व महिला),टेबल टेनिस संघ( पुरुष व महिला), बॅडमिंटन संघ ( पुरुष व महिला), क्रिकेट, फुटबॉल, शुटींग बॉल, व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ संघ ( पुरुष व महिला),खो-खो संघ, व्यायाम शाळा, शरीरसौष्ठव संघ,वेटलिफ्टींग संघ( पुरुष व महिला), पाॅवर लिफ्टींग संघ (पुरुष व महिला), नेमबाजी, अॅथलेटीक्स, गिर्यारोहण इत्यादी संघांच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन आणि मुंबई महानगरपालिकेचे नाव उज्ज्वल केले आहे.क्रीडा भवन कार्यकारिणी मंडळाचे मा.महानगरपालिका आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर दोन महापालिका उप आयुक्त उपाध्यक्ष आहेत.शंभर वर्षाच्या इतिहासात मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई महानगरपालिकेचे नावलौकिक करून सुवर्ण, रजत व कांस्य पदके जिंकली आहेत.राजेश मुदम टेबल टेनिस, अनिल रासम टेबल टेनिस, आत्माराम गांगर्डे, शिंदे पाॅवर लिफ्टींग व वेटलिफ्टींग, गोपीनाथ पवार पाॅवर लिफ्टींग, राजेश मुदम, अनिल रासम, आत्माराम गांगर्डे २००२ स्विझरलँड,२००४ जपान,२००६ जर्मनी,२००८ ब्राझील,२०१० चीन,२०११ थायलंड,२०१२ स्विडन,२०१८ अमेरिका,२०२२ ओमन,२०२४ रोम ,२०१६ श्रीलंका मास्टर कॉटेगिरीत जगातील ७५ हून अधिक देशातील १८०० खेळाडू सहभागी झाले होते.स्पर्धेत ४५००- ५००० खेळाडू खेळतात.त्यात मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनाच्या खेळाडूंनी अग्रक्रमांकावर आपले स्थान मिळवून मानाची अनेक पदके जिंकली.मुंबई महानगरपालिकेचे आणि क्रीडा भवनाचे नाव जगात व देशात मोठे केले.राष्ट्रीय पातळीवर २०१९ सोनपत हरियाणा,२०२२ जालंदर पंजाब येथील टेबल टेनिस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले अशा नामवंत खेळाडूंनी क्रीडा भवनाच्या शताब्दी वर्षाच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे.आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून विविध पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी अर्जुन पुरस्कार, श्री छत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त खेळाडू - उल्हास कर्पे छत्रपती पुरस्कार १९७३ मल्लखांब, अर्जुन पुरस्कार व छत्रपती पुरस्कार माया आक्रे - मेहेर कबड्डी १९८५, छत्रपती पुरस्कार विजया शेलार कबड्डी १९८७, छत्रपती पुरस्कार ज्योती शिंदे वेटलिफ्टींग १९९२, छत्रपती पुरस्कार संजय पाटील क्रिकेट १९९३, छत्रपती पुरस्कार ज्योती शिंदे पाॅवर लिफ्टींग, छत्रपती पुरस्कार अजित तावडे नेमबाज २०००, दादोजी कोंडदेव पुरस्कार माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे बुद्धीबळ १९९३.अशा खेळातील उच्च शिखरावर जाऊन नावलौकिक केलेले खेळाडू क्रीडा भवनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एकवटले आहेत.क्रीडा भवनाचे दहा हजारांहून अधिक सर्वसाधारण सभासद,अडीच हजार आजीव सभासद (यात नगरसेवकांचा ) समावेश आहे.मासिक वर्गणी वेतनातून जमा होते.क्रीडा भवनाचे कामगार आहेत त्यांना निवास स्थाने आहेत.
शताब्दी महोत्सवानिमित्त हंगामी कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे; अध्यक्षा श्रीमती माया आक्रे - मेहर अर्जून पुरस्कार व छत्रपती पुरस्कार (कबड्डी), आहे उपाध्यक्षा श्रीमती जयश्री खिलारी ( टेबल टेनिस), उपाध्यक्ष अॅड.विजय रावराणे (शुटींग बॉल), सचिव राजेश मुदम (टेबल टेनिस आंतरराष्ट्रीय खेळाडू),सह सचिव अजित कुशे ( आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक), खजिनदार जालंदर चकोर ( शुटींग बॉल),सह खजिनदार सुरेश घारे (क्रिकेट).
सदस्य - महादेव गोळवसकर,अॅड.सयाजी घाडगे, अनिल रासम, सुहास शिंदे, पंकज जाधव, राजेंद्र ठोंबरे, रविंद्र साळवी, अभिजित बागुल,दयाधन पाटोळे, ज्योती शिंदे,दोन वेळा छत्रपती पुरस्कार पुरस्कार,विल्सन वरळीकर (त्वायकांडो ), मंगेश बेळणेकर,राजनीस खटावकर, कैलास मटकर, विष्णू शेलार, संतोष जाधव,साजन भोईर, हेमंत कांबळे,कमलेश पांचाळ
दिनांक ३० मार्च २०२६ च्या सभेत पुढील प्रमाणे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.सभेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती माया आक्रे यांची निवड, मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन शताब्दी वर्ष साजरे करणे, शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी हंगामी कार्यकारिणीची निवड, नियोजित पुनर्विकास प्रकल्पात क्रीडा भवनाचे अस्तित्व कायम ठेवणे, मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनाच्या शताब्दी वर्षाच्या इतिहासातील माहितीपर निवेदने मा.महापौर ,मा.उप महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, अध्यक्ष स्थायी समिती, अध्यक्ष सुधार समिती, अध्यक्ष शिक्षण समिती, अध्यक्ष बेस्ट समिती, अध्यक्ष स्थापत्य समिती (शहर), अध्यक्ष स्थापत्य समिती ( उपनगरे), अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य समिती, अध्यक्ष बाजार व उद्यान समिती, अध्यक्ष विधी समिती, अध्यक्ष महिला व बाल कल्याण समिती,मा.महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका सह आयुक्त, महानगरपालिका उप आयुक्त इत्यादी मान्यवरांना निवेदन देणे, शताब्दी महोत्सव प्रारंभ दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करणे, कार्याध्यक्ष पदावर मुख्य सुरक्षा अधिकारी व छत्रपती पुरस्कार (नेमबाज)यांची निवड करण्यात आली. मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय आंतर महानगरपालिका क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत मा.महापौर , मा.महानगरपालिका आयुक्त , सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांना निवेदन देण्याबाबत सूचना महादेव गोळवसकर यांनी सभेत केली.सभेचे सुत्रसंचलन जालंदर चकोर यांनी केले आणि उपस्थित सर्व जेष्ठ खेळाडू, सभासद यांचे आभार मानले.
