एक दिवसीय राज्यस्तरीय फलज्योतिष, बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद

 


फल ज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष-राज्य परिषदेत सहभागी व्हा

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथील 

सिटू कामगार भवन,खुटवड नगर, नाशिक -८ येथे एक दिवसीय राज्यस्तरीय फलज्योतिष, बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद

शुक्रवार, दि.३/४/२०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे या परिषदेला जिल्ह्यातील विदर्भातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, अमरावती जिल्हा व शहर शाखा पदाधिकारी प्रफुल्ल मंदा श्रीधर, सुभाष गौरखेडे, विजय डवरे, रवींद्र फुले, वर्षा गावंडे, दिलीप लाडे, नरेंद्र धर्माळे, दिगंबर मेश्राम, सचिन खोब्रागडे, वैशाली राऊळ, मंजू वासनिक, आशिष देशमुख, सुनीता रामटेके, विजया घोडेस्वार यांनी केले आहे.

नाशिक येथील भोंदू अशोक खरात या बाबाच्या कृष्णकृत्याने पुन्हा एकदा संपूर्ण देशासह पुरोगामी महाराष्ट्र हादरला आहे या बाबाने महिलांचे लैंगिक, आर्थिक, भावनिक मानसिक केलेले शोषण, फसवणूक लुबाडणूक चव्हाट्यावर आलेली आहे त्यामुळे बुवाबाजीचे भिषण वास्तव समोर आले आहे शोषणाचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे त्यातच वैद्य व म्हात्रे सारखे बाबा भोंदूगिरी करून महिलांचे शारीरिक मानसिक भावनिक आर्थिक फसवणूकीचे प्रकारही उघडकीस रोज येत आहे  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३६ वर्षात सर्वच धर्मातील बहुसंख्येने हिंदू धर्मातील हजारो बुवाबाबांचा भांडाफोड केला आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे जादुटोणा विरोधी कायदा पास झाला असून सातशेच्या वर बाबावर केसेस दाखल झाल्या आहेत अनेकांना सजा व दंड ठोठावला असून अनेक बाबा जेलमध्ये आराम करत आहे तरी लोकांच्या दैववादी वृत्तीमुळे त्याचा फायदा घेण्यासाठी नवनविन हथकंडे वापरून नवनवीन बाबा उदयास येवून बिन भांडवली धंदा फळास येतो आहे ज्याला उद्योगपती,राजकारणी, समाजातील अति विशिष्ट व्यक्ती, प्रशासनातील अधिकारी यांचे राजरोसपणे समर्थन मिळत आहे त्याचा फायदा अशोक खरात सारखे भोंदूगिरी करणारे करून घेतात  या विरोधात जनमानस तयार व्हावे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, दैववादी प्रवृत्ती वाढीस लागू नये यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत वरील परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेची भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष 

मा.संजय बनसोडे, विशद करतील 

उद्घाटक  म्हणून खा.वर्षाताई गायकवाड मुंबई. या उपस्थित राहतील कार्यक्रमाचे 

मनोगत मा. कॉ. डी.एल.कराड,नाशिक व्यक्त करतील 

दुसरे सत्रात

 ऐसे कैसे झाले भोंदू

वक्ते : प्राचार्य डॉ.नितीन शिंदे,

 संपादक, अंनिप.इस्लामपूर,

अध्यक्ष मनोगत: मा.दादा चांदणे, सोलापूर

तिसरे सत्रात

बुवाबाजी विरोधी संघर्ष:- गुन्हे, तपास, कायदा व मनस्वास्थ्य

बाबासाहेब बुधवंत, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त अहिल्यानगर.

अँड.रंजना गवांदे, संगमनेर.

 डॉ. जयंत ढाके,मनोविकार तज्ञ नाशिक हे मांडणी करतील यानंतर शहरातून रॅली काढून समारोप होणार असून

बुवाबाजी विरोधी निर्धार  या विषयावर समारोपीय मार्गदर्शन  उत्तम कांबळे जेष्ठ पत्रकार,लेखक, नाशिक हे करतील यावेळी अध्यक्षस्थानी माधव बावगे, महाराष्ट्र अंनिस चे राज्य अध्यक्ष लातूर हे  राहतील.


Maharashtra Nasik


    

Post a Comment

Previous Post Next Post