मूर्तिजापूर तालुक्यात जमिनीच्या अचूक मोजणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात

 

Maharashtra Akola


पाच गावांची निवड  ; जमीन नोंदीत होणार पारदर्शकता


जमिनीच्या सीमावादावर उपाय ; पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाची अंमलबजावणी

अकोला, महाराष्ट्र


मूर्तिजापूर : राज्यातील जमिनीचे नकाशे आणि ७/१२ उताऱ्यातील विसंगती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना २०२४-२५ अंतर्गत पोट हिस्सा मोजणीचा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी किन्ही, शेणी, फणी, कंझरा आणि लोधीपुर या पाच गावांची निवड करण्यात आली आहे.

       या उपक्रमांतर्गत जमिनीच्या सध्याच्या धारकांनुसार शासकीय मोजणी करून नकाशे व अभिलेख अद्ययावत करण्यात येणार आहेत. प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुके निवडण्यात आले असून मूर्तिजापूर तालुक्याचा त्यामध्ये समावेश झाला आहे. पोट हिस्सा मोजणीमुळे जमीन व्यवहार अधिक पारदर्शक होणार असून सीमावाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अचूक डिजिटल नकाशा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी दिल्लीस्थित ‘प्युअर व्हेज इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड’ या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प प्रमुख डॉ. भीमचंद यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या गावांतील मूळ दस्तऐवजांची पडताळणी सुरू असून प्रत्यक्ष मोजणीला लवकरच प्रारंभ होणार आहे.

या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आमदार हरीष पिंपळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती भारती खंडेलवाल, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तसेच तहसीलदार शिल्पा बोबडे उपस्थित राहणार आहेत.या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूर्तिजापूरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख भास्कर सदार यांनी संबंधित गावांतील सर्व खातेदारांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post