नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक ३१/३/२०२६ रोजी नाशिक स्टार न्यूज, नाशिक व महामहिम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण माधव मंगल कार्यालय, पेठ रोड, नाशिक येथे भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “महिला रत्न” व “महामहिम रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्या सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रा. प्रकाश पांगम यांना “महामहिम रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. प्राजक्ता जठार* (नेत्रतज्ञ ) यांना “स्टार महिला रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. संदीप बाळासाहेब भिसे यांनाही “महामहिम रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी रोग मुक्त महाराष्ट्र”या सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था , नाशिक महत्त्वपूर्ण उपक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, पालक यांची आरोग्य तपासणी करून समाजात आरोग्य विषयी जागृती निर्माण करण्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.
श्री. रवी कुलकर्णी हेही कार्यक्रमास उपस्थित होते व विविध रक्त तपासणी व आरोग्य चाचण्यांमध्ये त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान या आरोग्य जनजागृती चे महत्त्व विचारत घेन्यात आले . या माध्यमातून करत असलेल्या विविध सामाजिक, आरोग्य व जनजागृती उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी प्रा. प्रकाश पांगम सर यांनी यांनी आजवर राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
रोग मुक्त महाराष्ट हा संकल्प पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी महापौर सौ. रंजनाताई भानसी तसेच नगरसेविका दिपाली गीते
कार्यक्रमाचे आयोजन नाशिक स्टार न्यूजचे संचालक श्री. विलास सूर्यवंशी व मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय जगन्नाथ ठाकूर यांनी केले होते.
समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांचा सन्मान करताना सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

