मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधापुरी शेतशिवारात एका ६० वर्षीय वृद्धाने उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी (दि. २ एप्रिल) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहीतीनुसार दिनेश बीरलाजी चव्हाण वय ६०, रा. मधापुरी असे मृतकाचे नाव असून ते सकाळी बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, दाढी रस्त्यालगत असलेल्या शेतात उंबराच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.या प्रकरणी संदिप संजय सोळंके,वय २३, रा. दर्यापूर, जि. अमरावती यांच्या जबानीवरून माना पोलीस ठाण्यात मर्ग क्र. ०९/२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे व पोलीस कर्मचारी आकाश काळे पुढील तपास करीत आहेत.

