गावाकडची बातमी प्रतिनिधी माहूर,किनवट पंकज जयस्वाल.
माहूर तालुक्यातील प्राथमिक शाळा मधील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. भारती पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तथा ग्रामपंचायत सदस्य लोकरवाडी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.सदर निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय नांदेड यांना देण्यात आले असून त्यामध्ये माहूर तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी करण्यात आली. यासोबत या निवेदनाची प्रतिलिपी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर यांनाही देण्यात आली आहे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


