'Ashwini Vitonde' appointed as Maharashtra State Director of Akshar Manav
ज्येष्ठ मराठी लेखक, कथा-कादंबरीकार डॉ. राजन खान सरांनी जालना येथे केली घोषणा..
अक्षर मानव राज्य महिला व कुटुंब या विभागाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून सुद्धा त्या काम पाहतील
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर अमरावती
अमरावती:- अक्षर मानव संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संचालक पदी तसेच महाराष्ट्र राज्य महिला विभाग व कुटुंब विभागाच्या प्रमुख पदी सुद्धा यांची या प्रसंगी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील रहिवासी असणाऱ्या 'अश्विनी वितोंडे-खान' यांनी या पुर्वी अमरावतीचे अक्षर मानव जिल्हा सचिव, अक्षर मानव तालुका अध्यक्ष अश्या महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन जालण्याच्या एका विषेश बैठकीत सर्वांमते निवड करुन त्यांना बढती देण्यात आली आहे.
अक्षर मानव ही संघटना 1981 पासून साहित्य, समाज, कला ,शिक्षण, पर्यावरण, उद्योग, श्रम, विज्ञान, अश्या मानवी जगण्याच्या विविध 96 अधिक विषयात राज्यभर काम करते. अक्षर मानव संघटना ही मानव हितासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन कुटुंब आणि समाजाच्या भल्यासाठी काम करते. जात, धर्म, देव, पंथ, भ्रष्टाचार, भेद, भाषा असे, सारे भेद दुर करणे आणि माणूस निर्मळ, प्रामाणिक, नेक, सजग व्हावा या उद्देशाने समाजाच्या भल्यासाठी ही संघटना काम करते. संघटनेतर्फे विविध उपक्रम राबवुन माणसं जोडणे, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होवून त्याचं जगणं सुसह्य करणेसाठी संघटना सतत संपुर्ण भारतभर काम करते.
महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी अश्विनी वितोंडे-खान यांची निवड करण्यात आली. अश्विनी वितोंडे-खान या मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, कायदा, अंकेक्षण, स्पर्धा परीक्षा, महिला सक्षमीकरण अश्या अनेक विविध क्षेत्रात त्या कुटुंब सांभाळून काम करत आहेत. तसेच एका कंपनीचे त्या संस्थापक संचालिका सुद्धा आहेत. त्याशिवाय त्या अक्षर मानव संघटनेचे अनेक, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर संमेलन, कार्यशाळा, संवाद सहवास, लेखन कार्यशाळा,जिल्हा परिषद शाळेमध्ये 'आनंदाचा एक तास' , 'बालक -पालक संवाद' असे अनेक कार्यक्रम, त्यांनी राबविले आहेत. अक्षर मानवचे विश्वस्त, प्रसिद्ध मराठी कथालेखक- कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षर मानव महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीने अश्विनी वितोंडे-खान यांची अक्षर मानव संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संचालक पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीने राज्यभर तळागाळातील लोकांपर्यंत अक्षर मानव संघटनेचे काम त्या पोहचवतिल असा विश्वास महाराष्ट्र राज्याच्या पालकमंत्री संजिवनी राजगुरू, राज्य संघटक प्रा. सुजित चव्हाण, महाराष्ट्र राज्य नियंत्रक आझाद खान, राज्य सचिव अरुण मापारी, राज्य पर्यटन प्रमुख संगिता हरी नरके, या मुख्य पदाधिकारींनी या प्रसंगी विश्वास व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. सोबत संचालक धुराजी कांबळे परभणी, संचालक गोकुळ दशवंत मुंबई, संचालक डॉ. यमुना नाखले नागपूर, तुषार अहीरे नाशिक, हर्षदा पिलाने पुणे संचालक, कवयित्री प्रांजली अत्रामताईंनी सुद्धा या प्रसंगी अश्विनीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या निवडी बद्दल अक्षर मानव राज्य कार्यकारिणी, सर्व विषयाचे राज्य प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, अमरावती जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका अध्यक्ष, मित्र परिवारातर्फे अभिनंदन करत आहे. सर्व साधारण कुटुंबातुन येऊन मोझरी सारख्या गाव पातळी ते राज्य पातळीवर अश्विनी वितोंडे-खान यांना काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अमरावतीकर व तिवसा - मोझरी येथील नागरिक कौतुक व प्रशंसा करत आहेत.


