सिंदगी (मोहपूर) येथे अवैध हातभट्टी दारूवर किनवट पोलिसांची धाड; मोठी कारवाई

 


नांदेड


किनवट - काल रात्री सिंदगी (मोहपूर) परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर किनवट पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलीस जमादार आशिष डगवाल आणि पोलीस जमादार ओंकार पुरी यांनी सहभाग घेतला. संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५(ई) व ६५(फ) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी धाडीदरम्यान अवैध हातभट्टी दारू निर्मितीशी संबंधित साहित्य जप्त केले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post