आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे दि. 2 मार्च रोजी सायं. 7 वाजताचे सुमारास श्रीरेणुका मातेच्या दर्शनासाठी माहुर गडावर आले असता सर्वप्रथम मंदिराच्या पायथ्याशी पुजारी विजय आमले. मिलिंद दुकानावर ऋषिकेश जोशी पत्रकार अपिल बेलखोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यानंतर त्यानी श्री रेणुका मातेची विधिवत पूजा अर्चा केली. त्यांच्या आगमनाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पंडित प्रदीप मिश्रा यांची सध्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे शिव महापुराण कथा सुरु आहे.शिव महापुराण कथा संपताच माहूरगड गाठून त्यांनी आदिशक्ती श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.त्यांनी मंदिरात प्रवेश करताच उपस्थित भाविकांनी रेणुका मातेचा जयघोष केल्याने वातावरण दुमदुमून गेले होते.
यानंतर रेणुका देवी संस्थानतर्फे पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा शाल श्रीफळमातेचा प्रसाद देउन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी ॲड उज्वल भोपी व ब्रह्मव्रुंद पुजारी उपस्थित होते.
दर्शनाचे औचित्य साधून पंडित मिश्रा यांनी माहूर नगरी गाठल्याने सर्वत्र धार्मिक उर्जा संचारली होती.रहदारीसाठी अडथळा निर्माण झाल्याने इच्छा असूनही त्यांना दत्तशिखर संस्थानवर जाता आले नाही.

