संघटन बळकटीसाठी संस्था व्यवस्थापन कार्यशाळा ठरली मार्गदर्शक - सुजाता गणेश

 




        जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

बडनेरा : नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे DAY-NULM अंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेमुळे वस्तीस्तर संघांच्या संघटनात्मक बळकटीस मोठा हातभार लागणार असल्याचे मत वसुंधरा शहरस्तर संघ, अमरावती यांच्या अध्यक्षा सुजाता गणेश यांनी व्यक्त केले.



कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सुजाता गणेश यांनी भूषविले. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे व प्रफुल ठाकरे यांनी संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, संघटन कौशल्य, आर्थिक शिस्त तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला अमरावती शहरस्तर संघाच्या सचिव वैशाली धुळधर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समुदाय संघटक  प्रफुल्ल कुकडे व  रेणुका कापुसकर यांनी कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत सहभागी महिलांना प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत विविध वस्तीस्तर संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये आदर्श संघाच्या नंदा तायडे, जनसेवा संघाच्या अध्यक्ष सीमा मडामे, लोकसेवा संघाच्या विजया घोडेस्वार, नवनिर्माण संघाच्या अध्यक्ष शीलाताई चौधरी, बुद्धछाया संघाच्या अध्यक्ष नूतन वासनिक, आधार संघाच्या अध्यक्ष छाया नारनवरे, सौमित्र संघाच्या उपाध्यक्ष रेखा गायगोले, सावित्री संघाच्या अध्यक्ष कल्पना हरणे, संकल्प संघाच्या अध्यक्ष अनुपमा गोंडाने, नारीशक्ती संघाच्या अध्यक्ष भारती पकडे तसेच संविधान, सहेली, स्त्रीशक्ती, संदेश, बंधन, जीवनशैली, सामना आदी संघांचे पदाधिकारी सहभागी झाले. प्रत्येक संघातील महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून किरण दुपारे, जयश्री गडेकर, सविता मते, योगिता वडुरकर, रुपाली हजारे, कुंदा मेश्राम, वंदना पवार, मनाली इंगळे, मोनाली सदावर्ते, मेघा ओगले, प्राजक्ता गोबरे, उमा इंगोले, रमा मोहोड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत संघ नोंदणी प्रक्रिया, बैठकींचे प्रभावी नियोजन, लेखा व्यवस्थापन, बचत गटांचे सशक्तीकरण तसेच संघांच्या माध्यमातून उपजीविका व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. सहभागी महिलांनी आपल्या अडचणी मांडून मार्गदर्शकांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली.

अध्यक्षीय मनोगतात सुजाताताई गणेश म्हणाल्या, “महिलांचे सशक्तीकरण हे सक्षम व संघटित संस्थांमधूनच साध्य होऊ शकते. वस्तीस्तर संघांनी एकजुटीने कार्य केल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. अशा कार्यशाळा महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यास व आत्मविश्वास वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरतात.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता गोबरे यांनी केले, संचालन उमा इंगोले यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन किरण दुपारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण दुपारे, जयश्री गडेकर, रुपाली हजारे, सुरेखा चवरे व जनसेवा संघ सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेच्या निमित्ताने भविष्यात अधिक सखोल व विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना सक्षम, स्वावलंबी व संघटित करण्यासाठी सर्व वस्तीस्तर संघांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा कार्यक्रम सर्व वस्तीस्तर संघ, बडनेरा तसेच वसुंधरा व अमरावती शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post