ग्रामस्थांनी स्वीकारली जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत जावरा येथे 'जल अर्पण दिवस' नुकताच साजरा करण्यात आला. या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमादरम्यान गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे योग्य नियोजन व नियमित देखभाल याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच जलसंधारण, पाणी बचत आणि स्वच्छ पाणीपुरवठा, या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. 'पाणी वाचवा, पाणी जपा' हा संदेश देत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला मिलिंद गुजरकर सरपंच ( प्रशासक), संजय घाणेकर (उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग , चांदूर रेल्वे , प्रितम ठक (कनिष्ठ अभियंता मयूर खांडेकर (कनिष्ठ अभियंता), शशांक तुरटकर (कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग), तुषार (कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चांदूर रेल्वे,)विमल मारबदे (विस्तार अधिकारी, आरोग्य ), जलजीवन मिशन कक्षातील राहुल गवई (गट समन्वयक) यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी ममता लांजेवार, उपसरपंच जयश्री, आशा, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक तथा विद्यार्थी उपस्थित होते.


