आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनी टारपे यांचा उपोषणाला जाहीर पाठींबा
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट :- किनवट शहराला लागून असलेल्या गोकुंदा येथील राष्ट्रीय. महामार्ग क्र. 161 अ (NH-161) वरील भोकर ते धनोडा दरम्यान गोकुंदा हाद्दीत येणारा सेंट मेरी स्कूल ते बाळासाहेब ठाकरे चौक आणि तेथून पुढे पेट्रोल पंप पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती व बांधकामाच्या मागणीसाठी गोकुंदा येथील ज्येष्ठ समाजसेवक मारुती संकूलवाड यांनी दिनांक 18 मार्चपासून उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला प्रदेशाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी भेट दिली यावेळी मारुती संकुलवाडा यांच्यासोबत चर्चा केली मारुती संकुलवाडी यांनी वर्षापासून दुरुस्त असलेल्या महामार्गावरील अपघाताची संख्या वाढली असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या बाजूलाअसलेल्या दुकानदाराणा धुळीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे. असे माननीय संकुलवाड साहेबांनी लक्षात आणून दिले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष या नात्याने उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. येणाऱ्या काळात हे काम पूर्ण नाही झाल्यास मारुती संकूलवाडसाहेब यांच्या सोबत रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.
