फेडरेशन ऑफ रेकनाईझ ऑर्गनायझेशन्स च्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गोसावी तर सचिवपदी ॲड.परिमल गवई यांची निवड


Gavakadachibatmi Village news




जाहिरात दवाखाना

                       जाहिरात संकलन- अनिल बंगाळे 


विदर्भ, अमरावती:- फेडरेशन ऑफ रेकनाईझ ऑर्गनायझेशन्स (भारतीय नागरिकांची मान्यता असलेल्या संस्था संघटनांचा महासंघ ) यांच्यातर्फे अमरावती विभागाची विभागीय चिंतन बैठक संस्थेचे अध्यक्ष सुरेश लोखंडे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह अकोला येथे दिनांक 15 मार्च 2026 रोजी संपन्न झाली. 

  त्यात ज्ञानेश्वर उद्धवपुरी गोसावी (अकोला) यांची अमरावती विभागीय अध्यक्षपदी तसेच ॲड. परिमल गवई ( अकोला )यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित Baap फाऊंडेशन मुंबईचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, योगेश कांबळे (छत्रपती संभाजीनगर), सुरेश ध्रुपकर (गोंदिया),  मिलिंद जामनिक स्व.नंदाबाई किर्दक बहुउद्देशीय संस्था मूर्तीजापूर अध्यक्ष, संतोष भालेराव माहिती अधिकार कार्यकर्ते परतवाडा, गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे, गाव सहेली च्या महाराष्ट्र संचालिका मंगलाताई भोगे ,कविता प्रल्हाद विंचु,

 पत्रकार भीमराव खंडारे, मनिष गुप्ता मेळघाट राज संपादक,  

बैठकीत पाच जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post