मुख्याध्यापक नितीन खोंडे यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षांचे नियोजन
निलेश रामगावकर / जिल्हा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे, तालुक्यातील निंबोली येथील जिल्हा परिषद शाळेने सलग चौथ्यावर्षी नवोदय प्रवेश चाचणीत भरारी घेतली असून येथील कांचन प्रमोद ढानके या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.त्याबद्दल सदर विद्यार्थीनीसह मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी इयत्ता सहावीत प्रवेशासाठी घेतली जाणारी एक प्रमुख स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा मानसिक क्षमता, अंकगणित आणि भाषा या तीन विभागांवर आधारित असते.हे विद्यालय हुशार विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवास आणि भोजन प्रदान करते.दरम्यान तालुक्यातील निंबोली येथील जिल्हा परिषद शाळेने सलग चौथ्यावर्षी नवोदय प्रवेश चाचणीत भरारी घेतली असून येथील कांचन प्रमोद ढानके या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.याबद्दल गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे,गटसमन्वयक धीरज जवळकार,
शिक्षण विस्तार अधिकारी सपना भोगावकर,मोहन देशमुख, सुनील तायडे,केंद्र प्रमुख अनिल ठाकरे,जगदीशकुमार सिरसाट,गौरव खोंडे,सुनील भावेकर,नरेंद्र काळे,साधन व्यक्ती व आदींनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धा चाचणी व परीक्षेसंदर्भात जादा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करण्यात येते.याची फलश्रुती म्हणून सलग चार वर्षापासून शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश चाचणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नितीन खोंडे,मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा निंबोली
