ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण

 

औरंगाबाद


फर्दापुर येथे ईद-उल-फित्र  उत्साहात साजरी;  हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण




छत्रपती संभाजीनगर , प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव: सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे  सर्व धर्मांमधील बंधुभाव वाढून एकमेकांना मिळणारा आदर, सामाजिक सलोखा आणि प्रेमाचे संबंध वाढविण्यासाठी अशी प्रार्थना करीत मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शनिवार रोजी ‘ईद उल फित्र’ अर्थात ‘रमजान ईद’ साजरी केली. नमाज पाठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, नवनविन कपडे घालून मिरवणारे चिमुकले अन् शिरखुर्म्याबरोबरच गुलगुलेचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देऊन ईद साजरी करण्यात आली.

मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले. या निमित्त गावातीलतील जामा मस्जिद, येथील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम नागरिकांनी सामुदायिक नमाज अदा केली. गावातील मशिदींना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच, अनेक घरांमध्येदेखील विद्युत रोषणाई केली होती. नागरिकांनी सकाळीच मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी गर्दी केली.

ईदगाह मैदानावर सकाळी ९:००  वाजता सामुदायिक नमाजपठण झाले. या वेळी जामा मस्जिद चे इमाम  आलीम अहैमद  कादरी   यांनी उपस्थित बांधवांना अल्लाहच्या शिकवणीचा संदेश दिला . रमजान ईदचा प्रत्येकासाठीच अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नमाजानंतर गळाभेट घेताना मनात वैर असेल तर ते काढून टाका. परस्परांतील वाद मिटवून टाका,' असा संदेश दिला .

 मुस्लिमबहुल भागातही उत्साहाचे वातावरण होते. काल रात्री चंद्रदर्शन  झाल्यावर सोशल मीडिया व्हाट्सअप, फेसबुक वर  ईद मुबारक च्या   एकमेकांना मेसेज पाठवून शुभेच्छा देत  होते .

ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी

फर्दापुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे निलेश लोखंडे पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवला होता त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य फोरोज पठाण भीमराव बोराडे योगेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य शेख निसार इस्माईल पटेल शेख जाकीर आरिफ शाहा ,  जगन्नाथ गवांडे, समाधान बावस्कर, अण्णा तांगडे ,माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे विला विलास वराळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नमाज पाठणानंतर मुस्लिम नागरिकांनां   ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. दुपारनंतर मुस्लिम बांधव कुटुंबासह गावभर गळा भेट देण्यासाठी फिरतांना दिसत होते .

 मुस्लिम बांधवांनी चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी सकाळी ९ ०० वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची नमाज अदा केली.

- मुस्लिम बांधव बच्चेकंपनीसह नवीन पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- ईद-उल-फित्रचा मोठा सण मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने तसेच शांततेत साजरा केला .

हजारोच्या  संख्यत मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.- यावेळी देशासह फर्दापुर प्रगतीसाठी  भाईचारा, एकोप्यासाठी तसेच शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. 


Post a Comment

Previous Post Next Post