गुढीपाडवा व दैनिक लोकदूत वर्धापन दीन निमित्त माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे भोजनदान वस्त्रदान फळं वाटप.

 

Village news


यवतमाळ , प्रतिनिधी श्रीकांत राऊत - गुढीपाडवा व दैनिक लोकदुत वर्धापनदिन निमित्त कळंब तालुक्यातील धोत्रा येथील माऊली वृद्धाश्रम येथे दैनिक लोकदूत परिवार ,मददगार फाउंडेशन व प्रतिभा फाउंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भोजनदान व वस्त्रदान आणि फळे वाटप करून गोड गुढीपाडवा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


Go.




 या प्रसंगी .दैनिक लोकदूत तालुका प्रतिनिधी रुस्तम शेख, इजि. प्रतिभाताई पवार (अध्यक्ष प्रतिभा फाउंडेशन यवतमाळ ) , सचिन शेळके ( सचिव प्रतिभा फाऊंडेशन यवतमाळ ) , मददगार फाऊंडेशनचे सचिव इंजिं प्रशांत सोयाम ज्ञानेश्वरराव ढोले सेवानिवृत्त शिक्षक , सुरेन्द्र रुद्राक्षवार अध्यक्ष माऊली वृद्धाश्रम , सौ मालाताई रुद्राक्षवार , मिनाताई वाघ इ मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रम मधील वृद्ध बांधवांना वस्त्रदान व फळ , भोजन देण्यात आहे तसेच त्यांच्या सहवासात राहुन विविध विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी प्रतिभा पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेन्द्र रुद्राक्षवार यांच्या सोबत वृद्धाश्रम बद्दल माहिती घेतली तसेच वृद्धा सोबत हितगुज केले त्यांचे मनोगत ऐकून प्रतिभा पवार भाऊक झाल्या तरी भविष्यात मी आणि माझे पती सचिन शेळके आणि आमचे प्रतिभा फाउंडेशन तुमच्या सोबत नेहमी आहे असे आश्वासन दिले, तसेच सर्व समाजाला विनंती केली की वृद्धाश्रमाला एक वेळा नक्की भेट द्यावी आणि फूल नाही तर फुलाची पाकळी मदत करावी यावेळी सर्व वृद्ध आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता.

Post a Comment

Previous Post Next Post