विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट: रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मासरेड ,राबवत बोधडी ( बुद्रुक) येथील शिवारात धाड टाकली या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मोह फुलाचे रसायन जप्त करण्यात आले,, सुमारे ३६, हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजे बोधडी बुद्रुक येथील जगन्नाथ बाबा माळ शिवारात छापा टाकला, या वेळी हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले अंदाजे ६००, लिटर मोहफुलांचे रसायन आढळून आले, पोलीसांनी ते जप्त करून पुढील कार्यवाही केली ,या प्रकरणी, उत्तम एकनाथ केंद्र,( रा,बोधडी बुद्रुक) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली आहे,या कारवाईत पोलीस उप निरीक्षक देविदास फडेवार पोलीस हेड कॉन्स्टेबल, सिद्धार्थ वाघमारे, प्रदीप आत्राम पोलीस कॉन्स्टेबल संजय राजनी तसेच महिला जमादार सुनीता डुकरे यांनी सहभाग घेतला पोलिसाच्या या कारवाईने हातभट्टी काढण्याचे धाबे दणाणले आहेत.
