शासनाने विक्री ची व्यवस्था करावी असे आवाहन
प्रतिनिधी/निलेश रामगावकर
तळेगाव दशासर :- स्थानिक धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील तरुण व्यावसायिक निशांत अनिल गवळी याने स्वतः घरीच मशरूम लागवड करून त्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे . व त्याचा हा व्यवसाय सुरळीत पणे सुरु आहे. याकरिता लागवडी ची जागा मात्र १८*१८ ची खोली आणि ईतर कुठलेही जागा नसल्याने हा प्रकल्प घरातील वरच्या मजल्यावर यशस्वी केला.
त्याने मागील वर्षी डिसेंबर २०२४ ला एक ट्रायल म्हणून ऑयस्टर मशरूमची लागवड केली होती आणि तो प्रयोग यशस्वी झाला तेव्हा त्याने केवळ १५०० रुपये गुंतवणूक करून ५० बेड पासून सुर्वात केली होती. आणि आता २१ डिसेंबर २०२५ ला १५० बेड लावले आणि ते यशस्वी झाले.
त्याला मशरूम लागवड बद्दल माहिती
आदर्श महाविद्यालयाच्या काशीखेड येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मशरूम शेतीसंदर्भात माहिती मिळाली होती. तसेच काही माहिती यू-ट्यूबवरूनही घेतली होती.
मशरूम २५ ते ६० दिवसांचे उत्पादन असून पाचदा तोडणी करता येते. ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मशरूमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले. ओल्या मशरूमचा दर सध्या प्रति किलो ३०० ते ४०० रुपये आहे. तर कोरड्या मशरूमचा दर जवळपास १५०० ते २००० प्रती किलो आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते. केवळ पारंपरिक शेती न करता परसबाग अथवा घरातील एका खोलीत मशरूम शेती सहजपणे करता येते. ग्रामीण भागात त्यानें हा मशरूम लागवड प्रकल्प कुठल्याही यंत्रसामग्री ची मदत न घेता दुसऱ्यांदा यशस्वी केला.
शासनाने विक्रीची व्यवस्था करावी असे मत निशांत ने व्यक्त केले आहे. नवीन रोजगार च्या संधी शोधणाऱ्यांनी तळेगाव येथे त्याचा हा छोटा प्रकल्प पाहण्या करिता येण्याचे आवाहन सुद्धा त्याने केले आहे.
