तहसील कार्यालयाजवळ कंत्राटदाराची मनमानी; आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले आत्मदहनाच्या इशाऱ्यावर ठाम


Gav



Gavakadachibatmi network,निलेश निंबाळकर 


वरुड शहरातील तहसील कार्यालयाच्या बाजूला सुरू असलेल्या विकासकामाबाबत गंभीर व संतापजनक प्रकार समोर आला आहे. सदर ठिकाणी कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू केल्याचे 12 मार्च 2026 रोजी प्रत्यक्ष पाहण्यात आले.

या कामासंदर्भात मागील 2024 पासून स्थानिक नागरिक व आक्रोश जनशक्ती संघटना यांच्या वतीने सातत्याने लढा देण्यात आला आहे. यासाठी उपोषण, चक्काजाम आंदोलन अशा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनांचा मार्ग अवलंबण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की, सदर ठिकाणचे काम नागपूर येथील संविधान चौकाच्या धर्तीवर करण्यात आलेले आहे तसे होणार .

मात्र आज प्रत्यक्षात कंत्राटदाराकडून प्रशासनाच्या आश्वासनाला पूर्णपणे धाब्यावर बसवत स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे काम सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी स्वतः पुढाकार घेत काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली. तसेच त्यांनी प्रशासनाला स्पष्ट व तीव्र इशारा दिला आहे की, येणाऱ्या दोन दिवसांच्या आत सदर काम संविधान चौक नागपूर प्रमाणे करण्यात आले नाही तर ते सुशिल बेले स्वतः आत्मदहन करतील.आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी आत्मदहनाचा इशारा देत प्रशासनाला जबाबदार धरले आहे. प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन मोडले जात असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत नगर परिषद वरुड, तहसीलदार कार्यालय, पोलीस प्रशासन वरुड, जिल्हाधिकारी अमरावती व उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.

आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर दोन दिवसांनंतर ते आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.या प्रकरणी तातडीने कारवाई करून नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन काम संविधान चौक नागपूरच्या धर्तीवरच्या प्रमाणे करण्यात यावे, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post