अपंग लाभार्थी यांनी यूडीआयडी आणि आधार कार्ड सादर करावे शारदा चौंडेकर

 




विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट: अपंग लाभार्थी यांनी यूडीआयडी आणि आधार कार्ड सादर करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या अपंग कल्याण विभागाच्या सूचनेनुसार, राज्यातील सर्व अपंग नागरिकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचे लाभपारदर्शकपणे देण्यासाठी यूडीआयडी कार्ड (युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड) आणि ई-डिसेबिलिटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.


राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यूडीआयडी कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना इत्यादी योजनांचा लाभ घेणाऱ्या अपंग लाभार्थ्यांनी त्यांच्या यूडीआयडी कार्डची माहिती सरकारकडे नोंदवावी.

म्हणून, किनवट तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या यूडीआयडी कार्ड आणि आधार कार्डची एक प्रत तहसील कार्यालय, किनवट येथे सादर करावी, तरी, सर्व दिव्यांग लाभार्थी यांना की त्यांनी त्यांचे यूडीआयडी कार्ड आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे ३१ मार्च २०२६ पर्यंत तहसील कार्यालय, किनवट येथे सादर करून सहकार्य करावे.


डॉ. शारदा चौंडेकर तहसिलदार, किनवट


Post a Comment

Previous Post Next Post