प्रतिनिधी - पवन पाटणकर शिराळा
प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे आज दिनांक १३/३/२६ रोजी एचपीव्ही लसीकरणाचे उद्घाटन कु. अनुष्का उमेश चिंधेकर एचपीव्ही पात्र लाभार्थी च्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
सध्या एचपीव्ही लसीकरण बाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करून नागरिकांना लसीकरनाकरीता प्रवृत्त करत आहे. नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीती व संभ्रमाचे निराकरण आरोग्य कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.
सध्या लाभार्थी मुलींचे पेपर व किरकोळ आजारपण त्यामुळे लाभार्थींचा एचपीव्ही लसीकरणाबाबत नकार आहे. तरीसुद्धा एचपीव्ही लसीबाबत संपूर्ण माहिती व आरोग्य शिक्षण आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी गृहभेटी देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. एचपीव्ही लसीकरणाबाबत सध्या नकार देत असलेल्या लाभार्थींची यादी बनविली असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येऊन लसीकरन करून घेण्यासाठी सकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्यात येईल.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथील वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. हर्षा गोहत्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनात एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांमध्ये मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे मॅडम, आरोग्य सहाय्यिका नलिनी बोरकर, आरोग्य सहाय्यिका निरुपमा खऊळ, आरोग्य सेविका पल्लवी इंगोले, आरोग्य सेविका प्रतीक्षा भोयर, आरोग्य सेवक श्री अतुल सोमवंशी, आरोग्य सेवक श्री मुरलीधर भोपाळे, आशा सेविका अर्चना घोंगडे, शुभांगी कडू, मंजुषा मेश्राम, विठाबाई रघुते, ममता नागे,रेखा मोहोड, नलिनी गावंडे, लाभार्थी मुलींचे पालक व पात्र लाभार्थी मुली उपस्थित होत्या.
तसेच यावेळी मा. डॉ. हर्षा गोहत्रे मॅडम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा यांच्या हस्ते लसीकरण झालेल्या लाभार्थींना लसीकरणाबाबत प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.

