उमरीत ३१ मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव; डॉ. गायत्री रामटेके यांचा कार्याचा आलेख उंचावण्याचा संदेश
नांदेड : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांच्या कार्याचा गौरव आणि त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी उमरी येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात उत्साहात पार पडला. महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गायत्री रामटेके यांच्या हस्ते पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा, कला आणि शौर्य आदी क्षेत्रांतील ३१ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सन्मानासोबत जबाबदारीही वाढते!
पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्राप्रतीची जबाबदारी अधिक वाढवणारा असतो, असे प्रतिपादन डॉ. गायत्री रामटेके यांनी केले. ‘मी रमाई बोलतेय’, ‘मी जिजाऊ बोलतेय’ आणि ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह तेलंगणात वैचारिक प्रबोधन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदर्श पत्रकार पुरस्कार : बजरंगसिंह रामसिंह हजारी (माहूर), पिराजी लक्ष्मण कराडे, संदीप बळीराम राठोड, गजानन गंगाधरराव बिडकर, शेख अस्लम (देगलूर), राहुल सोमाजी कोलते, सुखानंद वैजनाथ रोडगे.
आदर्श शिक्षक पुरस्कार : माधव विठ्ठल गायकवाड, बी. एल. खंडारे, मनोज पिंकुजी बरसागडे, ज्योती निर्गुणराव वाठोरे, नंदकुमार लक्ष्मण दुधे, देवना भूमन्ना भोगावार, पंचशीला सुनीता वेले, विष्णू शंकर शिंदे, गौस खान खुर्शीद खान पठाण.
आदर्श समाजभूषण पुरस्कार : सय्यद चांद सेठ, व्यंकटी गोविंदराव जाधव, सुजाता एस. साबळे, डॉ. दिनेश ताराचंद खैरे, संगीता शेषराव भक्ती, हिरावती रामभाऊ चक्रपाणी, बाबू संभाजी शिंदे, बालाजी लक्ष्मण निलावार, अब्दुल रहीम पटेल अब्दुल वहीद पटेल.
आदर्श कला गौरव पुरस्कार : सदानंद शाहदेव मोरे, साहेबराव विठ्ठल लांडगे.आदर्श कलाभूषण पुरस्कार : बापुराव मोहनराव जमदाडे.
आदर्श शौर्य गौरव पुरस्कार : काकासाहेब हणमंत भालेकर, सय्यद वाजेद अली सय्यद अन्वर अली, रविकांत साहेबराव चोपवाड.
संस्थापक अध्यक्ष शेख आरीफ निमटेककर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची भूमिका स्पष्ट केली. अल्प मानधनावर कार्य करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासह ६ जानेवारी २०२७ रोजी पत्रकार दिनानिमित्त उमरी तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या तथा अभिनेत्री डॉ. गायत्री रामटेके, पंचफुला वेले, रेल्वे विभागीय मंडळाचे अध्यक्ष परसमल दरडा, उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन आर्मळ आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख आरीफ निमटेककर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव आणि समाजाप्रती जबाबदारीचे भान देणारा संदेश यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनकांबळे यांनी केले, तर आभार संस्थापक अध्यक्ष शेख आरीफ निमटेककर यांनी मानले.





