बालभारती पाठ्यपुस्तक समीक्षेसाठी शेषराव संभाजी पाटील( सिंदगीकर) यांची निवड

 

Maharashtra India Nanded



तहसीलदार अभिजीत जगताप यांनी पुस्तके देऊन केला सन्मान 




श्रीक्षेत्र माहूर :  पुनर्रचित अभ्यासक्रम मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षा सत्रासाठी माहूर चे जेष्ठ शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा माहूर चे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील यांची पुणे येथे बालभारती ने निवड केली असून त्याबाबत चे पत्र नुकतेच त्याना देण्यात आल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी त्यांचा पुस्तके देऊन सन्मान केला.

            महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ वेळोवेळी अभ्यासक्रम निश्चित करुन त्यामधे सुधार व निर्माणाचे काम सतत करते. मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाची साचेबंद,प्रमाणीत व निर्दोष मांडणी आणि विद्यार्थी विकास साधण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच राष्ट्रीय उद्दीष्टे,नैतिक मूल्ये व विवीध कौशल्याच्या विकासासाठी हे समीक्षण सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असे असते


              मागील शैक्षणिक वर्षात सुद्धा जेष्ठ शिक्षक शेषराव पाटील यांना बालभारती ने आमंत्रित केले होते.आणि याही वर्षांत त्यांना या चिकित्सक कार्यास आमंत्रित करण्यात आले आहे ही विशेष व अभिमानास्पद बाब आहे. मागील पस्तीस वर्षांपासून ते अदिवासी,डोंगराळ व वाडी तांड्यांनी व्याप्त असलेल्या माहूर किनवट या दुर्गम भागात कार्यरत आहेत.शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून देत त्यांनी विद्यार्थी विकासासाठी कार्य तर केलेच आहे परंतू संघटनेच्या माध्यमातून ते अनेक शैक्षणिक समस्यांना व शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात नेहमीच पुढे येणारे शिक्षक नेते आहेत. 

            त्यांचा प्रदीर्घ व सर्वंकष सेवेचा विचार करत त्यांना नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक जिल्हा गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.तसेच अनेक इतरही पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.आदर्श शिक्षक म्हणून त्यांना या समीक्षा सत्रासाठी निवडणे हे माहूर साठी ही अभिमानास्पद असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी त्यांचा पुस्तके देऊन सन्मान केला .

 गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार,विस्तार अधिकारी संग्राम कांबळे ,संतोष मोहन चव्हाण यशवंत वाघमारे बिरमवार ,रमेश मुनेश्वर ,डॉ. अरुण धकाते , मिलिंद कंधारे, संजीव वाठोरे, भाग्यवान भवरे, मनोज बारसागडे,यांच्या सह माहूर व परिसरातील शिक्षणप्रेमी यांनी शेषराव संभाजीराव पाटील यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post