बामादेही जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक यांचे चौकशीवर स्वतंत्र तपासणीची मागणी
विभागीय संपादक- निलेश रामगावकर
उपसंपादक/संतोष भालेराव
अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत चिखलदरा पंचायत समिती ग्रामपंचायत बामदेही प्राथमिक शाळेतील शिक्षक तसेच प्रभारी मुख्याध्यापक यांच्या कामकाजा संदर्भात तक्रारी नोंदवल्या असून, त्यावर झालेल्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विवेक सुधाकरराव कडू यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे स्वतंत्र व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात संबंधित शिक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची, शालेय नोंदी आणि शासकीय नियमांनुसार कामकाज झाले आहे का याची पडताळणी करण्याची मागणी आहे. तसेच,राहत्या घराचे केदार नगर देवमाळी परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यावर तक्रारदाराने भर दिला असून, अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत त्याची तपासणी करण्याचा आग्रह केला आहे. यापूर्वी झालेल्या चौकशीच्या अहवालावर अवलंबून न राहता, उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांची पडताळणी करून तसेच माहुरे शिक्षक हे देवमाळी मधून रोज चार चाकी गाडीने परतवाडा ते बहिरम मार्गे टोलनाका क्रॉस करुन बामादेही येथे जाणे येणे करतात त्यामुळे तेथील सी. सी. टीव्ही. फुटेज व फास्ट ट्रॅक चलान व मोबाईल मॅसेज, बँक पासबुक यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशीही यामध्ये मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी संबंधित शिक्षकांवरील आरोप सिद्ध झालेले आहेत असे म्हणता येणार नाही, तर शिक्षण विभागाची अधिकृत भूमिका आणि चौकशी अहवाल येईपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट होणार नाही.असे तक्रारदार यांनी दिलेल्या पत्रातून नमूद केले.
