श्रीमती कौशल्यादेवी वृद्धाश्रमात धम्मचक्र परिवर्तन दिन व दसरा निमित्त ज़ाकिर हुसैन व राजू पटेल यांची सदिच्छा भेट

 




वाशिम : सामाजिक बांधिलकी जपत श्रीमती कौशल्यादेवी वृद्धाश्रम येडशी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन व दसरा साजरा करण्यात आला. यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष झाकीर हुसैन, जनहित लोकशाही पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पटेल मलनस, संस्थेचे अध्यक्ष कैलास अवचार, विनोद अवचार, वृद्धाश्रमातील इतर वृद्ध महिला पुरुष उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत सण साजरा करून त्यांच्याप्रती आदर, आपुलकी आणि सामाजिक जिव्हाळा व्यक्त करण्यात आला. तसेच वृद्धाना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, सन्मान आणि सहवास देणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच दसऱ्याच्या निमित्ताने समाजात प्रेम, सद्भावना आणि एकतेचा संदेश देण्यात आला.

सामाजिक सलोखा जपण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी समाधान देणारा ठरला. समाजातील वंचित, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक सेवा असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post