अकोल्यात अमरावती विभागातील सामाजिक संस्थांची चिंतन बैठक ; RTI कार्यकर्त्यांचा सन्मान...!

 

भालेराव



 जनहित व लोकशाही बळकटीसाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे विचारमंथन



अकोला : शासकीय विश्रामगृह, अकोला येथे रविवारी (दि. 15 मार्च 2026) अमरावती विभागातील सामाजिक संस्था प्रतिनिधी व जनहितासाठी माहिती अधिकार कायद्यावर प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची चिंतन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक विषयांवर तसेच माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते म्हणून सहभागी होण्याचा सन्मान लाभला. लोकशाही व संविधान सशक्त करण्यासाठी देशहिताची जबाबदारी म्हणून उपस्थित राहून विचार व अनुभव मांडण्याची संधी मिळाल्याने हा क्षण अत्यंत अभिमानास्पद व भावनिक ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, भारतीय संविधानाची उद्देशिका, सहभाग गौरव प्रमाणपत्र तसेच माहिती अधिकार कायदा 2005 मार्गदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ गौरव नसून संविधान, लोकशाही व जनहितासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Editor-in-Chief Devendra Bhonde


या कार्यक्रमास Baap फाऊंडेशन मुंबईचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, योगेश कांबळे (छत्रपती संभाजीनगर), सुरेश ध्रुपकर (गोंदिया),  ज्ञानेश्वर गोसावी (अकोला), देवेंद्र भोंडे (संपादक – गावाकडची बातमी), संतोष भालेराव (RTI कार्यकर्ते), गाव सहेलीच्या महाराष्ट्र संचालिका मंगलाताई भोगे, अँड. परिमल गवई (अकोला), मिलिंद जामनिक (अध्यक्ष – स्व. नंदाबाई किर्दक बहुउद्देशीय संस्था, मूर्तीजापूर), मनिष गुप्ता (मेळघाट राज – संपादक), अरने सर (अंजनगाव सुर्जी) व  विशाल खंडारे (बुलढाणा) यांच्यासह अमरावती विभागातील विविध जिल्हे व तालुक्यांतील सामाजिक संस्था प्रतिनिधी, संविधान रक्षक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बैठकीत लोकशाही, संविधान मूल्ये आणि जनहितासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर कसा वाढविता येईल यावर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

जय संविधान, जय लोकशाही, जय भारत.


Post a Comment

Previous Post Next Post