सिंदगी (मोहपूर) येथे आज 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न

 

गावाकडची बातमी

विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

  शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणे हा  शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित या शिबिराद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात, चकरा माराव्या लागू नयेत, हा मुख्य हेतू होता.

शिबिरामध्ये विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते,यात महसूल विभाग: उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) आणि सातबारा उतारा दुरुस्ती.

 कृषी विभागकडून पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि कृषी अवजारांवरील अनुदानाबाबत मार्गदर्शन आरोग्य विभागाकडून मोफत आरोग्य तपासणी, आयुष्यमान भारत कार्ड (Health Cards) वाटप आणि लसीकरण, माहिती.तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने संजय गांधी, निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंगांसाठीच्या, विविध योजनांचे अर्ज भरून घेणे.

या शिबिरास तालुक्यातील (तहसीलदार) डॉक्टर शारदा चौंडेकर,, रफिक शेख (नायब तहसीलदार) ( मंडळ अधिकारी) देविदास कांबळे, ( तलाठी, ) रोहिणी माने ,( तलाठी), शालन मेंडके, (तलाठी) आदिनाथ डुकरे,,व निराधार योजने चे( आवल कारकुन),, संदिप तागड,,( महसूल सहाय्यक), एच ,जि, भिसे,,शुभम पवार (आपरेटर ,)पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, स्वस्त धान्य दुकान व अंगणवाडी सेविका व मदतनीस, या शिबिरात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केले,

सिंदगी (मोहपूर) आणि परिसरातील गावांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले. विशेषत :

 * वेळेची आणि पैशांची बचत झाली.

 * अनेक प्रलंबित कामांचा निपटारा एकाच छताखाली झाला.

 * शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचली. 

Post a Comment

Previous Post Next Post