कामनापुर ता. भातकुली येथील हराळ परिवारातील जिजाऊ-रमाई-सावित्रीच्या लेकींचा हृदयस्पर्शी व कौटुंबिक सत्कार
मुला-मुलींनो शिक्षणात उंच उडान घ्या, माय-बापांचे कष्ट, श्रम आणि मेहनत वाया जाऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केले.
कामनापुर येथील सेवाभावी व्यक्तिमत्व देवानंद हराळ यांच्या कन्या सुजाता व मनीषा यांची Maharashtra State Security Corporation मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल दिनांक 14 मार्च 2026 रोजी त्यांचा कौटुंबिक सत्कार या भागातील गोरगरिबांचे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी संपूर्ण हराळ परिवार, शुभम पाटील भूगुल, अनिल खोब्रागडे, जयंत दाभाडे, सौरभ तायडे, कुणाल तायडे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील व परिसरातील सर्व तरुण मुला-मुलींनी सुजाता व मनीषा यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.
