प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
छत्रपती संभाजीनगर - प्रज्ञा शील करुणा समता बंधुता न्याय आणि मानवतेचा संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पहिले राज्यस्तरीय “भीम शब्द साहित्य संमेलन” तेजस बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक १० मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर आयोजीत करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात आंबेडकरी विचारांचे राज्यभरातील साहित्यिक कवी, लेखक कलाकार, शिक्षक विद्यार्थी साहित्य रसिक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.साहित्य संमेलनाची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व संविधानाची प्रस्ताविकेचे वाचन करुन करण्यात येणार आहे.
या संमेलनात काव्यवाचन, साहित्य चर्चा, कथाकथन परिसंवाद विचारमंथन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर साहित्यिक आणि कलाकार उपस्थित राहणार असून साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तरी सर्व भीम अनुयायी समाज बांधव, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संमेलन आयोजक लेखिका कवियत्री मेघा डोळस व कवी महेंद्र तुपे यांच्या वतीने करण्यात आले आहे.लवकरच संमेलन अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
