धामणगाव रेल्वे : तालुक्यातील सद्धम्म प्रचार केंद्र महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने सद्धम्म संस्कार केंद्र उसळगव्हाण येथे पाच दिवशीय ध्यान साधना व व्यक्तिमत्व शिबिर या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक समारोपय कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर शिबिरामध्ये आणि जिल्ह्यामधून शिबिरार्थी सहभागी झाले होते.
या शिबिरामध्ये बौद्ध धम्माचा इतिहास, बुद्ध धम्म संघ त्रिपिटक म्हणजे काय, नामरूप,छडायतन, आना पान स्मृतीधानाचा सराव महिलांचे कर्तव्य, सीगल कथा, तथागत भगवान बुद्धांनी बुद्धत्व कसे प्राप्त केले, विविध विषयावर या पाच दिवशीय शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन प्रामुख्याने मैत्रीचे ध्यान यावेळी घेण्यात आले.
या शिबिरामध्ये सह आचार्य म्हणून सुधीर वानखडे,पि.यू,लोखंडे, स्वयमराव ढोणे, गोविंद इंगोले, अविनाश बनसोड, आधी मान्यवर उपस्थित होते.
या समारोपिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक शिबिरार्थींनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर शिबिर हे होळीच्या पर्वावर घेण्यात आले असल्याचे आचार्य सुधीर वानखडे यांनी यावेळी सांगितले.
