नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक :- नाशिक श्री राम जन्मभूमी त्यांच्या वास्तव केलेली नागरी नाशिक येथे भव्य दिव्य आशा नाशिक नगरीमध्ये महाराष्ट्राची कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळाचे आयोजन मनु मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांचा चौथा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधून स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा ७ मार्च २०२६ संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती संस्थापक अध्यक्ष नाशिक,कमलेश बोडके नगरसेवक, ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे संस्थापक सल्लागार आशाताई मोरे, चंद्रकला ताई धुमाळ नगरसेविका, निलमताई पाटील नगरसेविका, शिलाताई त्रिभुवणे समाजसेविका मेघाताई राजेश शिंपी संस्थापक अध्यक्ष मनु मानसी अध्यक्ष संस्था नाशिक या सोहळ्यामध्ये पारितोषिक विजेते यांना मानाचा फेटा सन्मानपत्र स्मृतीचिन्ह अल्प आहार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी मनू मानसी पदाधिकारी यांनी कमेटी मोठे धाडस दाखवून कर्तुत्ववान विविध क्षेत्रातील आपला ठसा उमटवणारे विविध क्षेत्र माध्यमातून मानाचा सन्मान देण्याचा मानस त्यांनी मांडला विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी व्यक्ती त्यांना हा पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण रोटरी क्लब हॉल नाशिक गंजमाळ येथे ठीक सकाळी ११ वाजेला होणार आहे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा प्रेरणादायी व प्रेरणेने राष्ट्र मोठे होतात याची जाणवेतून राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण ५० मान्यवरांचा सन्मानित करण्यात येणार आहे..
