अमरावती : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच प्रदेश अध्यक्ष कांचन मुरके अमरावती व अखिल भारतीय मराठा महासंघ महिला मंच अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा भव्य सत्कार, सन्मान व गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कांचन रिसोर्ट, वलगाव रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शोभना देशमुख उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून सुलभाताई खोडके, प्रीती देशमुख (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प. अमरावती), डॉ. अनुभूती पाटील (स्त्रीरोग तज्ञ), राजश्री जढाळे (संचालक, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक), सुरेखा लुंगारे (नगरसेविका), अक्षरा लहाने (विदर्भ कार्याध्यक्ष, महिला मंच – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ) एडवोकेट पूनम झवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान गायन, कथक नृत्य तसेच सुंदर कविता सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. माया बोरखडे (आयुर्वेदाचार्य), हर्षा ढोक (क्रीडा क्षेत्र), कांचन उल्हे (उद्योग क्षेत्र), वैशाली बर्डे (उद्योग क्षेत्र), कविता घाटोळ (उद्योग क्षेत्र), कांता काळे (आरोग्य सेवा), कविता बुंडे (समुपदेशक), मीनाताई राहिंज (पत्रकारिता), आदित्य मेहता (नृत्यकला), कृतिका तायडे (उद्योग क्षेत्र), प्रा. डॉ. मंजुषा सागर (शिक्षण क्षेत्र), गौरी शतके (गायन), कु. सुयोग संतापे (लेखन) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, उपाध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, भातकुली तालुका अध्यक्ष संजय तराळ, अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, जिल्हा सचिव मनोज मेळे यांच्यासह अनेक पत्रकार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन मुरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंजुषा सागर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होऊन समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हिचा आमचे प्रार्थना अन हेच आमचे वागणे या गीताने करण्यात आली स्नेह भोजनाने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह इतर मंडळींनी आनंद घेतला.


