जागतिक महिला दिनानिमित्त न्यूगा बेस्टमध्ये रुग्णांचे सन्मानपूर्वक पूजन...!

 

Murtizapur news


 महिला-पुरुष रुग्णांचे पाय धुवून कृतज्ञता व्यक्त


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 


मूर्तिजापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 मार्च रोजी श्री गाडगे महाराज विद्यालया समोर सदगुरु कॉम्लेक्स मध्ये फिजिओथेरपीची निशुःल्क सेवा सुरु असलेल्या न्यूगा बेस्ट केंद्रात येणाऱ्या सर्व महिला व पुरुष रुग्णांचे शाखेचे संचालक प्रेम नारायण कुशवाह यांनी सपत्नीक पाय धुवून पूजन केले. या उपक्रमातून रुग्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




       या वेळी केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पाय धुवून पूजन करण्याची अनोखी परंपरा राबवित रुग्णांना आदर व मान दिला गेला. या कार्यक्रमात महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमात अनेक महिला व पुरुष रुग्ण उपस्थित होते. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. न्यूगा बेस्ट केंद्राच्या वतीने अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अरुणा कांबळे ( सेविका ) यांच्यासह बहुसंख्य महिला,पुरुष उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post