स्त्री म्हणजे आदिशक्तीचा जागर आणि नात्यातील स्त्रीची भुमिका अदभुद असते .ज्याची कुणी तुलना देखील करू शकत नाही नातं हे प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतेवर आधारलेले असते. नांत टिकवून ठेवणारी ही स्त्रीचं तर असते.
एका स्त्री चे अनेक रूप असतात.सगळ्यात आधी ती कुणाची तरी मुलगी असते, नंतर बहीण, सून आणि त्यां नंतर आई हे असे अनेक रूप आपत्याला तिच्यात बघायला मिळतात. घर टिकवणं एका स्त्री च्या हातात असते.
नाती म्हणजे एक धाग्याप्रमाणेच असतात.धागा जसा नाजूक असतो त्याच प्रमाणे नाती सुद्धा नाजूक असतात. धागा ताणला की तो तुटतो त्याच प्रमाणे नात्यात गैरसमजाची विष पडली की नांत सुद्धा तुटतो . नात्यातला दुरावा दुर करणारी ती स्त्रीच तर असते.
नात्यात आपल्या गोड स्वभावाने आपला सुगंध बहरवणारी ती स्त्रीच तर असते . स्त्री नात्यात प्रेमाची उब निर्माण करते. स्त्रीची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तिचा समजुद्दार पणा असतो. नात्यात जर भांडण आणि गैरसमज झाले तर ती स्त्री शांततेने सांभाळून घेते.
आणि आजच्या जीवनात स्त्री घर सांभाळू आपले इतर काम देखील करत असते. पहिलेच्या काळात लोकं स्त्रीचं काही अस्तित्व नाही असे समजत होते. तिचं काम फक्त "चूल आणि मुल" आहे असे म्हणायचे. पण मी म्हणते की तीच "चूल आणि मूल" करणारे स्त्री आज जगाच्या पाठीवर काही पण करू शकते. आपण म्हणतो की पुरूषाला खूप काही करावं लागतं. आपल्याला फक्त पुरुष घरच्यासाठी काम करतो, मुलांना शिकवतो हेच दिसतं. पण स्त्रीचे कष्ट काही दिसत नाही. आणि आपण हे बघत नाही की ती स्त्री सकाळी उठल्यापासून राब-राब राबते आणि घरातली कामे करते. घरातल्यांना काही हवं नको ते बघते. सगळ्यांना सांभाळून घेते तरी पण त्या स्त्रीला म्हटले जाते की स्त्री कुठे काय करते? संसार उभा करणारी ती स्त्री तर असते. मला सांगा स्त्री काय नाही करू शकत? स्त्री सगळेच काही करू शकते. जे पुरुष करू नाही शकत ते स्त्री करू शकते. मला असं वाटते की, स्त्री ची जागा नुसती घर संसार चालवणे नाही तर बाहेर पण तिची जागा असावी.
भारताचे पहिले डॉक्टर एक महिलाच तर होती मग त्या महिलेने असा विचार केला असता अरे ,आतापर्यंत तर कोणती स्त्री डॉक्टर नाही झाली तर मी कशाला होऊ,असं म्हटली असती तर चाललं असतं काय? नाही ना. म्हणून मी सांगते की स्त्री खूप काही करू शकते. मला असं वाटते की स्त्री कुठेच मागे नाही. फक्त तिला घरच्यांचा आधार हवा असतो मग ती प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकते.
आणि आता तर आपल्या पहिल्या महिला तर आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री *(श्रीमती सुमित्रा अजितदादा पवार).* आणि त्या जर असं म्हटले असते की "मी कसं कळणार. मी तर एक स्त्री आहे आणि हे क्षेत्र तर खूप मोठं आहे, असं म्हटलं असती तर चाललं असतं काय? नाही ना. जबाबदाऱ्या घ्यावेच लागतात. तेव्हा तर आपली प्रगती होईल. स्त्री काय नाही करू शकत? स्त्री हवाईजहाज सुद्धा चालवू शकते तर, ती सगळच करू शकते.
मला असं वाटते की आपण जागतिक महिला दिन एक दिवसासाठी का साजरा करतो फक्त दाखवण्यासाठी काय? मग तो तर रोज साजरा केला पाहिजे.महिला दिन म्हणजे फक्त उत्सव नाही, तर समानता आणि सन्मानाचा संकल्प आहे...
सिद्धी भास्कर बन्सोड
कुरखेडा,जि.गडचिरोली
7378470441
