राज्य स्तरीय सी.पी. डी.व सी.एन.इ.मध्ये वंदना बरडे सहाय्यक अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचा सहभाग

  

News nagpur



Gavakadachibatmi network 

Nagpur : दिनांक २ मार्च २०२६ ला राज्य प्रसूती शास्त्र प्रशिक्षण संस्था डागा स्त्री रुग्णालय नागपूर यांनी आयोजीत केला होता. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन कलेक्टर ऑफिस जवळ सदर नागपूर येथे आयोजित केला होता.

विषय होता ( रेड्युस प्रायमरी सिझेरियन सेक्शन रेट थ्रो मिड वायफ्री लेड केअर )सिझर डिलिवरी रेट कमी करून नैसर्गिक डिलिवरी करण्यावर भर देणे व नैसर्गिक डीलेवरी करणे.

या कार्यक्रमासाठी डॉ पुरुषोत्तम मडावी डायरेक्टर मुंबई महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. शशिकांत शंभरकर डेप्युटी डायरेक्टर नागपूर सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ शमशोन खानम , यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ललिता मेश्राम अधिसेविका, आशा मेटांगे अधिसेविका, कल्पना काळे प्रिन्सिपॉल डागा नर्सिंग कॉलेज भारती सूर्यवंशी , यांनी प्रशिक्षण दिले. डॉ .शंभरकर यांनी या कार्यक्रमा मार्फत खूप सुविधा होऊन आपण आपल्या उद्देशापर्यंत पोहचू अशी आशा व्यक्त केली.तसेच शुभेच्छ्या दिल्या.आणि डॉ पुरुषोत्तम मडावी यांनी या कार्यक्रमा विषयी प्रचार व प्रसार करून शुभेच्छा दिल्या.




   वंदना विनोद बरडे सहाय्यक अधिसेविका यांनी सांगितले की आज आपण सर्व जे काही शिकलो ते ग्रामीण भागातील मातांना ते कळवावे . आणि नैसर्गिक डिलिवरी करण्यावर भर द्यावा. यासाठी ३०० नर्सिंग कॅडर चे व्यक्ती हजर होते. या मध्ये अधिसेविका , सहाय्यक अधिसेविका,परिसेविका ,अधिपरिचारिका हजर होत्या.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल च्या वैशाली तायवाडे अबझरवर म्हणून होत्या. प्रशिक्षण खूप छान झाले.

Post a Comment

Previous Post Next Post