स्वरगुंजन गृप च्या वतिने मूर्तिजापुरात झाला सत्कार सोहळा
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : कुठल्याही क्षेत्रात यशोशिखर गाठायचे असेल, तर सातत्यपूर्ण व कठोर परीश्रमाला पर्याय नाही, असे स्वानुभवकथन महाभारत मालिकेत बलरामाची भूमिका प्रभावीपणे साकारणारे सिने कलावंत सागर साळुंके यांनी येथे केले.
'स्वर गुंजन' कराओके ग्रुप च्या वतीने येथील बियाणी जीन परीसरात गुरूवारी (ता.२६) आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. प्रख्यात स्री रोग तज्ज्ञ डॉ.विक्रम शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा,अविनाश बेलाडकर व डॉ.कपील महाजन उपस्थित होते. सिमरण रामचरण राठोड या चिमुकलीने स्वागत गीतसादर केले.
येथील मुळ रहिवासी असून मुंबईत पोलीस दलात सेवा देत सहायक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झालेले व बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेसह अनेक मालिका व चित्रपटांमधून भूमिका साकारणारे सागर साळुंके व इंडियाज ग्रेट टॕलेंट टीव्ही शो च्या टॉप 5 मध्ये निवड झालेली सिमरन रामचरण राठोड यांचा प्रोत्साहन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.प्रविण तांबडे यांनी केले. डॉ.प्रविण नागपूरे यांनी आभार मानले.
उद्योजक अनिल बियाणी, डॉ. रामचरण राठोड, डॉ. वंदना राठोड, सचिन बोनगिरे, विलास नसले, शैलेश अग्रवाल, प्रवीण भागवत, कृष्णा राठोड, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'स्वर गुंजन 'कराओके ग्रुप च्या गायकांसह सागर साळुंके यांनी यावेळी सिनेगितांचे अप्रतिम सादरीकरण केले व सागर साळुंके यांनी महाभारत मालिकेतील त्यांचा डायलॉग टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सादर केला.
