प्रतिनिधी , निलेश रामगावकर
तळेगाव दशासर : स्थानिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शेंदुर्जना खुर्द येथील पेशंट अनिल भाऊरावजी खेत्री यांना येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदर पेशन्टची तपासणी करून त्यांना रेपर करण्याचा सल्ला देण्यात आला. व त्यानंतर पेशन्टच्या नातेवाईकांनी १०८ वर फोन केला. परंतु त्यांनी ऍम्ब्युलन्स अव्हेलेबल नसल्याचे सांगितले. परंतु यावेळेस १०८ ही रुग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्रात उभी असल्याचे निर्दषणात आले.
त्यामुळे जमलेले नागरिक संतापले व या ठिकाणी १०८ रुग्णवाहीका उभी असून सुद्धा सदर विभाग टाळाटाळ करीत असल्याचे आरोप उवस्थित नागरिकांनी केला. व योग्यवेळी पेशंटला रुग्णवाहीका व उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव गेला असल्याचा आरोप अजय अनिलरावं खेत्री यांनी केला. याबाबत अर्जदार अजय अनिलराव खेत्री व नागरिकांनी सदर निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस स्टेशन तळेगाव दशासर यांना देण्यात आले व याला जबाबदार कोण असा सवाल निवेदना मार्फत विचारण्यात आला आहे.

